Supreme Court Hearing Today Shivsena Uddhav Thackeray Mashal Symbol Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Group Election Symbol: ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह जाणार की राहणार? 'या' दिवशी होणार कोर्टात सुनावणी

ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह जाणार की राहणार? 'या' दिवशी होणार कोर्टात सुनावणी

साम टिव्ही ब्युरो

>> प्रमोद जगताप

Uddhav Thackeray Group Election Symbol: मागील वर्षी शिवसेनेत फूट पडून दोन गट निर्माण झाले होते. यामध्येच निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. यावर समता पक्षाने आक्षेप घेतला होता.

सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलली. मशाल चिन्हाच्या याचिकेवर आता ६ आठवड्यांनी सुनावणी पार पडणार आहे.

या अगोदर दिल्ली उच्च न्यायालयात उदय मंडल यांनी या संदर्भात अपिल केले होते. मात्र, न्यायालयाने मंडल यांची याचिका फेटाळली होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धनुष्यबाण आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात मिळालं होतं. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाने पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या गटाला दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. या संदर्भात ३१ जूलैला सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, समता पक्षाचा जनाधार घटल्यानं निवडणूक आयोगाने समता पक्षाचं निवडणूक चिन्ह मशाल हे गोठवले होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

SCROLL FOR NEXT