मुंबई - एकनाथ खडसे Eknath Khadse पुण्याच्या Pune भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांना ईडीने ED समन्स बजावले आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. पत्रकार परिषदेत खडसे काही मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांची प्रकृती Health खालावली असल्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादीकडून NCP देण्यात आली आहे. Will Eknath Khadse be present in the ED office due to ill health
हे देखील पहा -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने बुधवारी समन्स बजावले होते. आज सकाळी खडसे यांना ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. पण आता त्यांची प्रकृती खालावल्यामुळे खडसे ईडीच्या कार्यालयात हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ खडसे पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले आहेत. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली असून त्यांना विशेष न्यायालयाने १२ जुलै पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसंच एकनाथ खडसे यांना देखील अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला होता. त्यांयर एकनाथ खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.