Gautami Patil News Saam Tv
मुंबई/पुणे

Gautami Patil News: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजितदादा हजेरी लावणार? आमदाराच्या बर्थडेला निमंत्रण

Pune News Today: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार?

रोहिदास गाडगे

Ajit Pawar News Today: राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार आज सायंकाळी पुण्याच्या खेड तालुक्यात एका कार्यक्रमासाठी येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गौतमी पाटील येत असल्याने अजित पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार का..? या कडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी गौतमीला तिच्या कार्यक्रमाबाबत सल्ला देत खडसावले होते. मात्र, दरम्यानच्या काळात बारामतीत गौतमीचा कार्यक्रम ठेवायचा का असं म्हणतच अजित पवारांनाही गौतमीच्या कार्यक्रमाचे आकर्षण झाल्याची चर्चा सुरु होती. (Pune News)

त्यातच आता खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने राजगुरुनगर येथे महाराष्ट्राचा हास्य जल्लोष या कँमिडी शोचे आयोजन करण्यात आले आहे. तर मोई येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची वेळ देखील एकच आहे.

अजित पवार (Ajit Pawar) राजगुरुनगर येथील हास्यजल्लोष या कार्यक्रमाला येणार असल्याचे आयोजकांकडुन जाहिर करण्यात आलं. दरम्यान दुसरीकडे मोई या गावात होणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजित पवारांनी यावं यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे आज अजित पवार हे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? अशा उलटसुलट चर्चा खेड तालुक्यात सुरु झाल्यात.

गौतमीच्या आडनावावरून वाद

गौतमी तिच्या नृत्याने नेहमीच चर्चेत असते.अशात आता सातत्याने वादाच्या विळख्यात असलेली गौतमी पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. ज्या गौतमी पाटीलची हवा तरुणाईमध्ये आहे, त्या गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तिने पाटील हे आडनाव वापरू नये. पाटील आडनाव वापरून तिने पाटलांची बदनामी केली. गौतमीने पाटील हे आडनाव वापरुनये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिरपूर उपनगराध्यक्ष पदावर भाजपचे संगिता देवरे यांची निवड

Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

"डॅडी इज होम..."; डोळ्यावर गॉगल, एका हातात गन अन् दुसऱ्या हातात सिगार, यशच्या 'Toxic'चा टीझर आऊट; पाहा VIDEO

Pune Nagpur : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुणे ते नागपूर रेल्वे गाड्या २२ दिवस रद्द; कारण काय?

Shocking: अश्लिल व्हिडिओ पाहून ठेवायचा शरीरसंबंध, बायकोची सटकली; प्रायव्हेट पार्ट दाबून नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT