Congress Leader's Saam TV
मुंबई/पुणे

"हातात तलवार घेतलेल्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई करणार का?" (पहा Video)

'तलवार दाखवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी माझ्यावर शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : स्टेजवरती तलवार दाखविल्याबद्दल काँग्रेस (Congress Leaders) नेत्यांवरती कारवाई होणार का ? असा सवाल करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक फोटो ट्विट करत मुंबई पोलिसांंवर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये (Tweet) लिहलं आहे की, तलवार दाखवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माझ्यावर शस्त्रास्त्र कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

आता मला पहायचं आहे की या तीन काँग्रेस नेत्यांविरुद्ध पोलीस गुन्हा नोंदवतील का? असा सवाल उपस्थित करत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना विनंती करतो की त्यांनी निःपक्षपाती आणि निष्पक्ष कारवाई करावी अन्यथा तुम्हीही इतरांसारखेच आहात अशा आशयाचं कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट केलं आहे.

एका कार्यक्रमामध्ये मंत्री अस्लम शेख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी हातात तलवार घेतलेला एक फोटो कंबोज यांनी ट्विट केला असून मी २३ फेब्रुवारीा तलवार हातात घेतली म्हणून माझ्यावर तक्रार दाखल केली होती आता देखील तोच न्याय लावणार का या नेत्यांवर गुन्हा दाखल करणार का असा सवाल केला आहे.

दरम्यान, त्यांच्या या ट्विट वरती काँग्रेसनेते अस्लम शेख यांनी हा शीख समज कार्यक्रम होता त्यांनी तलवार दिली, मोदी यांना पण तलवार दिली आहे. तलवार घेऊन आम्ही लोकांमध्ये नाचलो नाही. दोन्ही कार्यक्रमात फरक आहे असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

SCROLL FOR NEXT