बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून
बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून SaamTvNews
मुंबई/पुणे

बायकोच्या प्रियकराला कापून मृतदेह भट्टीत जाळला! 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे खून

गोपाल मोटघरे

पुणे : भरत उर्फ भूषण चोरगे असं खून झालेल्या 27 वर्षाच्या मृत व्यक्तीच नाव आहे. बावधन येथे  राहणाऱ्या लंकेश सदाशिव राजपूत याच्या बायकोशी भूषणच विवाह बाह्य अनैतिक संबंध होते. याची कल्पना लंकेश राजपूतला 21 ऑक्टोबर ला झाली. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीस बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे देखील पहा :

मात्र, पत्नी त्याच्या तावडीतून निसटली आणि त्यांच्या पत्नीला भेटायला आलेला  प्रियकर त्याच्या सापड्यात सापडला. त्यानंतर लंकेश याने आपल्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून अगोदर भूषण चा खून केला. त्यानंतर पौड पोलीस स्टेशन हद्दीतील उरवडे येथील नाल्याच्या बाजूला असलेल्या दारू भट्टी जवळ मृतदेह नेऊन दोन दिवस आरोपींनी भूषण मृतदेह दारू भट्टीत जाळून त्याची राख पुरावा नष्ट करण्यासाठी घोटावडे येथील नदीच्या पाण्यात वाहून टाकली आहे.

भूषण चा खून आरोपींनी दृश्यम सिनेमाच्या कथानक का प्रमाणे केलेला आहे. पोलिसांची  दिशाभूल करण्याकरिता आरोपींनी दृश्यम चित्रपटाच्या कथानकाचा वापर या खुणा केला आहे. मात्र, एक चप्पल, एक लोखंडी रॉड आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी लंकेश सदाशिव राजपूत, गोल्या  उर्फ अरुण कैलास राजपूत, सचिन तानाजी  राजपूत आणि इतर एका बाल गुन्हेगाराला अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil: सहानुभूतीसाठी कटकारस्थान... प्रकाश शेंडगेंच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार

Copper Ring: तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Today's Marathi News Live: शरद पवारांचा विश्वासू शिलेदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार?

Shruti And Santanu Break Up : ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती हासन आणि शांतनू हजारिकाचा ब्रेकअप?, एकमेकांना इन्स्टाग्रामवर केलं अनफॉलो

SCROLL FOR NEXT