Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : जेवणाचा डबा न दिल्यानं पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Pune Crime News In Marathi : पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही म्हणून रागाच्या भरात पतीने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

अक्षय बडवे, पुणे

Pune Crime News In Marathi : पुणे येथील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही म्हणून रागाच्या भरात पतीने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही. त्यामुळे रागाने पतीने तिला मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. कोंढवा परिसरातील उंड्री येथील होले वस्ती भागात ही घटना घडली.  (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल सोमनाथ पांडागळे (वय २७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात तिचा पती सोमनाथ महादेव पांडागळे (वय ३०) याला अटक केली आहे.

सोमनाथ हा मोलमजुरीची कामे करतो. तर शीतल ही फिरस्ती होती. दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी एका मंदिरात जाऊन लग्न केले होते. (Crime News In Marathi)

शनिवारी सकाळी कामावर जाताना शीतलने सोमनाथला जेवणाचा डबा दिला नाही. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाले. सोमनाथने लाकडी बांबूने शीतलला मारहाण केली. या मारहाणीच्या दरम्यान तिला फिट आली आणि ती बेशुद्ध पडली.

तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला.

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT