Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

"ED म्हणजे येडा; फडणवीसांच्या पक्षातील मंत्र्यावर गुन्हे का नाहीत"

'2 हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याऱ्या दरेकरांवर कोणी बोलत नाही.'

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची चौकशी का झाली नाही? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. ईडी व्यक्तींना पाहून टार्गेट करत आहे. ईडी म्हणजे येडा झाली आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

2 हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्याऱ्या प्रवीण दरेकरांवर कोणी बोलत नाही. जे पुरावे मिळाले त्याच्या मुळाशी जावं मात्र विरोधकांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांकडेही पाहावं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पक्षातीलही अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल होत नाहीत असंही ते म्हणाले.

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या विरोधात कागदपत्रे आम्ही दाखल केली तरीही अजून कारवाई होत नाही. एकदा सभागृहात विनोद तावडे यांनी दरेकरांवर आरोप केले मात्र आता त्या आरोपांचं काय झालं? कुठे गेले ते आरोप, हा माझा सवाल आहे असही जगताप म्हणाले.

दरम्यान, सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांना महाविकास आघाडीवर केलेल्या वक्तव्यावरती कोण सुजय विखे पाटील? माझ्या आयुष्याची 40 वर्ष मी काढली, हे कोण आहेत नक्की पाटील? छोट्याश्या हळदीने पिवळं होणारे हे आहेत असा टोला त्यांनी सुजय विखे पाटलांना लगावला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT