नियम न पाळणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना परवानगी, मग नियम पाळणाऱ्या नाटकांना का नाही; अतुल पेठेंचा सवाल! SaamTV
मुंबई/पुणे

नियम न पाळणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना परवानगी, मग नियम पाळणाऱ्या नाटकांना का नाही; अतुल पेठेंचा सवाल!

केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत 'शब्दांची रोजनिशी' नाटकाच्या खासगी प्रयोगाला परवानगी नाकारली.

अमोल कविटकर, पुणे

पुणे : केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत 'शब्दांची रोजनिशी' या नाटकाच्या खासगी प्रयोगाला अतुल पेठे यांनी मागितलेली परवानगी मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही, असं कारण पोलिसांनी परवानगी नाकारताना दिलं आहे. (Why rules-based Dramas are not allowed)

हे देखील पहा -

राज्य सरकारच्या आताच्या नियमावलीनुसार सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांना परवानगी नाही याचाच आधार घेत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एकीकडे राजकीय मेळावे, जनयात्रा सुरु असून त्यात नियमदेखील पाळले जात नाहीत, तर दुसरीकडे नियम पाळून आम्ही खासगी प्रयोगासाठी परवानगी मागत असताना ती का दिली जात नाही? असा सवाल अतुल पेठे यांनी उपस्थित केला आहे.

कोरोना काळ सुरु झाल्यापासून नाटक क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी शासन दरबारी आपली खंत व्यक्त केली आहे आम्हाला नियमावली पाळून थिअटर सुरु करायला परवानगी द्या कारण नाटक क्षेत्रावरती अवलंबून असणारी अनेकजण सध्या आर्थिक संकटाना तोंड देत आहेत. मात्र त्यांना हवी त्यावेळी परवानगी आणि त्यांच्या इच्छेनुसार मिळाली नाहीच. अशातच आता नाटक कलाकार संतप्त झाले आहेत एकिकडे राजकारण्यांच्या सभा त्यांचे मेळावे चालतात मात्र नियम पाळून ही आम्हाला परवानगी मिळत नाही हा भेदभाव का असा प्रश्न देखील हि कलाकार मंडळी उपस्थित करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नारळी पौर्णिमा अन् राखी पौर्णिमा कधी आहे? भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भारताच्या नंदनवनात आणखी एक वंदे भारत ट्रेन धावणार; कोणत्या स्टेशनवर थांबणार?

Maharashtra News Live Update: सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा ईशारा

Toxic Movie: यशच्या 'टॉक्सिक'ची जोरदार क्रेझ; ॲडव्हान्स बुकिंगमधूनच केली इतक्या कोटींची कमाई

August 31 Deadline: 31 ऑगस्टपूर्वी ही 4 कामं करा, नाहीतर भरावा लागू शकतो दंड!

SCROLL FOR NEXT