Uddhav Thackeray On Nitesh Rane saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: उंची पेंग्विनची, चाल बदकाची अन् आवाज कोंबडीसारखा, उद्धव ठाकरेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray On Nitesh Rane: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना थेट त्यांची पार्श्वभूमी काय आहे?, असा प्रश्न विचारला.

Priya More

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांना जोरदार टोला लगावला. 'उंची पेंग्विनची, चाल बदकाची अन् आवाज कोंबडीसारखा...' , असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना सांगितले की, 'सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात आहेत. भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेले आहे. अरे तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही.',अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांची भरसभेत कान टोचले.

यासोबतच उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे यांची पाश्वभूमी काय आहे यावरून प्रश्न विचारत टीका केली. 'तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय आहे? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे? आणि तू आमच्यावरती बोलत आहेस.' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंना खडसावून सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सेनेवर देखील जोरदार निशाणा साधला. आता त्यांना प्रश्न पडला असेल की, एवढं सगळं केलं. त्यांनी माणसे फोडली, पक्ष फोडला, चिन्ह चोरली तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही. कारण त्यांना कल्पना नाही की शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलं आहे. आम्ही पैसे फेकून जमवलेली माणसे नाही आहोत. त्यांचे विचार अंगात भिनवून कट्टर हिंदूनिष्ठ आणि महाराष्ट्र धर्म पाळणारे आम्ही शिवसैनिक आहोत.', या शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT