सांगा दारू कुठे प्यायची? पुणेकरांनी माहिती अधिकारात विचारला हटके अंदाजात प्रश्न Saam Tv
मुंबई/पुणे

सांगा दारू कुठे प्यायची? पुणेकरांनी माहिती अधिकारात विचारला हटके अंदाजात प्रश्न

सचिन धनकुडे यांच्याकडून कोथरुड डेपो येथे त्यांच्या स्वतःच्या २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत या बसा आणि प्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अश्विनी जाधव-केदारी साम टीव्ही पुणे

पुणे - माहिती अधिकारामुळे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळणं आता सोपं झालं आहे.  नुकताच माहिती अधिकारात विचारलेल्या एका प्रश्नाने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे डोके चक्रावले आहे. पुण्यातील कोथरूड मध्ये राहणाऱ्या सचिन धनकुडे यांनी राज्य उत्पादन शुल्क पुणे कार्यालयाला माहिती अधिकारात चक्क सांगा दारु प्यायची कुठे हा प्रश्न  विचारला आहे. मद्य परवाने हे वैयक्तिक रित्या मद्य सेवनाकरता असल्याने मद्य सेवन कोणत्या ठिकाणी करावे याबाबत उल्लेख नाही असं उत्तर त्यांना माहिती अधिकारात मिळाल आहे.

हे देखील पहा -

दरम्यान, सचिन धनकुडे यांच्याकडून कोथरुड डेपो येथे त्यांच्या स्वतःच्या २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत या बसा आणि प्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आयोजकांच्या वतीने मसाला दूध मोफत देण्यात येणार आहे. जर कोणी मद्य सेवन करणारे असतील तर त्यांनी त्यांच्या पैशातून आणलेली दारु प्यावी. मद्य विषयक धोरणात स्पष्टता आणावी ही मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Maharashtra News Live Update: सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT