Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance  Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीची कोंडी? ठाकरेंच्या युतीचं घोडं अडलं कुठं? राजकीय समीकरण युतीतला अडथळा?

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance : दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा नेमकी कुठं अडलीय? कोणत्या मुद्द्यांमुळे युतीचं बोलणं होत नाही? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये....

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टिव्ही

मुंबई : मनसे आणि ठाकरे गटाच्या सैनिकांचं मनोमिलन झालंय. मात्र वरिष्ठ स्तरावरुन कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे युती होणार की नाही? अशा चिंतेत कार्यकर्ते असताना मनोमिलनाआधीच जागा वाटपाच्या चिंतेमुळेच युतीचं घोडं अडल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

मनसेला युतीचा प्रस्ताव द्यायचा कुणी? हा ठाकरेंपुढे प्रश्न

2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचा 84 जागांवर विजय

मनसेकडे एकही नगरसेवक नसल्याने जागांबाबत तिढा

तुल्यबळ दावेदार असलेल्या जांगांसाठी काय प्रस्ताव द्यायचा? याविषयी संभ्रम

ठाकरे बंधूंची युती फडणवीस होऊ देणार नाहीत, अशी ठाकरे गटाला शंका

युतीची चर्चा आमच्या अटींवर व्हावी, अशी ठाकरे गटाची भूमिका

राज ठाकरे -फडणवीस भेटीनंतर युतीच्या चर्चांना ब्रेक लागल्याचं म्हटलं जात होतं.. मात्र आता संजय राऊतांनी अटी-शर्ती आणि फॉर्म्युल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एकीकडे युतीची चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाने मात्र माजी नगरसेवकांची बैठक बोलावलीय. त्यामुळे माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर युतीची कोंडी फुटणार की तिढा आणखी वाढत जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT