Sushma Andhare-Uday Samant  Saam TV
मुंबई/पुणे

Sushma Andhare On Uday Samant : भाजप एकनाथ शिंदेंना कधी सोडणार? याचं उत्तर द्या, सुषमा अंधारेंचा उदय सामंतांवर पलटवार

Sushma Andhare On Uday Samant : काँग्रेसचे 13 आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. उ

Dnyaneshwar Choutmal

Sushma Andhare On Uday Samant : राज्याच्या राजकारणात सध्या नेमकं काय चाललंय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, म्हणून ते सुट्टीवर गेलेत, अशी चर्चा आहे.तर दुसरीकडे अजित पवार भावी मुख्यमंत्री अशीही चर्चा आहे.

भाजपमधील नेतेही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहे. या सर्व राजकीय घडामोडींदरम्यान राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी मोठा दावा केला आहे.

काँग्रेसचे 13 आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंत यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Latest News)

सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, उदय सामंत अत्यंत समंजस नेते आहेत, असा आमचा समज आहे. त्यामुळे काँग्रेसचे किती आमदार साथ सोडणार, आमचे किती आमदार फुटणार? राष्ट्रवादीचे किती आमदार सोडून जाणार? यावर भाष्य करण्यापेक्षा भाजप एकनाथ शिंदे यांना कधी सोडणार? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधायला हवं.

काय म्हणाले उदय सामंत?

ठाकरे गटाचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे 20 आमदारही शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. साताऱ्यात काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची लाट! २९ महापालिकांवर झेंडा, शिंदे-पवारांची गरज कुठे? ठाकरे बंधूंना किती जागा? पाहा महा एक्झिट पोलचा अंदाज

Trendy Kurta Desing: कॅज्युअल आणि ऑफिस वेअरसाठी ट्राय करा 'हे' सुंदर ट्रेंडी कुर्ता

Saam Tv Exit Poll: मुंबई ठाकरेंच्या हातून जाणार, एक्झिट पोलचा अंदाज, पाहा महायुतीला किती मिळणार जागा?

Municipal Elections Voting Live updates : सोलापुरात मतदानच्या शेवटच्या वेळी दोन गटात भांडण

Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! येत्या १८ जानेवारीला होणार वाहतुकीत मोठा बदल; वाचा नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT