रॅगिंग पीडित विद्यार्थ्याला न्याय कधी ? Saam Tv
मुंबई/पुणे

रॅगिंग पीडित विद्यार्थ्याला न्याय कधी ?

संबंधित दोषीवर एट्रोसिटी एक्ट नुसार कारवाई व्हावी

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - विद्यार्थ्याकडून केईएम कॉलेज आणि हॉस्टल मध्ये रैगिंग झाल्याने मानसिक तनावा खाली असलेल्या विद्यार्थ्याला तात्काळ न्याय मिळावा आणि संबंधित दोषीवर एट्रोसिटी एक्ट नुसार कारवाई व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. केईएम रुग्णालयात ऑक्युपेशनल वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या सुगत पडघन या विद्यार्थ्यांची इतर विद्यार्थ्यांकडून रॅगिंग सुरू होती. जातिवाचक शिविगाळ करणे,अपशब्द वापरणे आदी प्रकार सुरु होते त्यासंदर्भात या विद्यार्थ्याने कॉलेज अधिष्ठाता, शिक्षक, अधिक्षक, विभागप्रमुख, वार्डन, विद्यार्थी चिटणीस यांना पत्र,ईमेल करीत तक्रार दिली होती.

हे देखील पहा -

त्यावर काही कारवाई झाली नाही. उलट मला कॉलेज मधुन काढून टाकू असं धमकावल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केला आहे. या प्रकरणामुळे कम्युनिस्ट पक्ष अधिक आक्रमक झाला असून, अधिकारी आणि रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाहीची मागणी केली जात आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT