हॉटेल 'The Lalit' मध्ये काय गुपित दडलंय? नबाब मलिक रविवारी सांगणार... Saam Tv
मुंबई/पुणे

हॉटेल 'The Lalit' मध्ये काय गुपित दडलंय? नबाब मलिक रविवारी सांगणार...

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी आज एक सुचक ट्विट केलंय. हॉटेल 'The Lalit' मध्ये काय गुपितं दडलीयं? याबाबत नबाब मलिक रविवारी सांगणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik NCP) हे सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यांचं कारण म्हणजे त्यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede NCB) आणि भाजप यांच्यावर केलेले गंभीर आरोप. अनेक पत्रकार परिषदा घेऊन नवाब मलिकांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय. १ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत तर त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis BJP) गंभीर आरोप केले होते. विरोधकांच्या विरोधात उघडलेल्या या मोहिमेचा पुढचा भाग म्हणून आता ते रविवारी आणखीन एक खुलासा करणार आहेत. हॉटेल 'The Lalit' मध्ये काय गुपितं दडलीयं? याबाबत नबाब मलिक रविवारी सांगणार आहेत. (What's the secret in Hotel The Lalit? Nawab Malik will tell on Sunday)

हे देखील पहा -

नवाब मलिकांनी आज एक सुचक ट्विट (Nawab Malik's Tweet) केलंय. त्यात त्यांनी सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर "हॉटेल द ललितमध्ये खूप सारी गुपितं दडली आहेत, रविवारी भेटुयात" असं ट्विट त्यांनी केलं आहे. Hotel The Lalit हे मुंबईतील एक महागडं असं पंचतारांकित हॉटेल असून अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेही याठिकाणी येत असतात. त्यामुळे नवाब मलिक या हॉटेलातलं कोणतं गुपित बाहेर आणतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT