Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar On Karnataka Election Result: 2024 च्या निवडणुकांमध्ये देशात काय होईल? कर्नाटक निकालावरून शरद पवार यांनी दिले महत्वाचे संकेत

Latest News: शरद पवार यांनी यावेळी अधिकृत निकाल येण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले.

Priya More

Karnataka Assembly Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची (Karnataka Assembly Election) मतमोजणी सुरु आहे. या निकालामध्ये काँग्रेस पक्षाची हवा पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्ष भाजपला मागे टाकत आघाडीवर आहे.

कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाची विजयाच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी यावेळी अधिकृत निकाल येण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले. तसंच, 'सत्तेचा गैरवापर केल्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

भाजपवर जनतेचा रोष -

शरद पवारांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला निकारले आहे. मोदी-शहांनी सभा घेऊनसुद्धा तिथल्या जनतेचा भाजपवर रोष व्यक्त होईल अशी खात्री होती. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.' तसंच, कर्नाटकचे चित्र देशभर दिसेल असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी यावेळी काँग्रेसपक्ष आणि उमेदवाराचे अभिनंदन केले आहे.

भाजपचा पराभव जनतेने केला -

शरद पवारांनी पुढे असे सांगितले की, 'फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना मान्य नाही हे आज स्पष्ट झाले. आज झालेले मतदान यश-अपयश समजू शकतो. कर्नाटकमध्ये भाजपकडे 65 जागा तर काँग्रेस 133 जागांवर आघाडीवर आहे. भाजपपेक्षा काँग्रेस दुप्पट जागेवर आघाडीवर आहे. भाजपचा सपशेल पराभव जनतेने केलाय. त्याची मुख्य कारणं सत्तेचा आणि साधनांचा गैरवापर ही आहे.'

भाजप सत्तेबाहेर जातेय -

तसंच, 'केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये नाही. पंजाब आणि दिल्लीमध्ये नाही. याचाच अर्थ बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल? याचा अंदाज यातून लावू शकतो. धर्म, जातीचा एकदा वापर केला. त्याचा एकदाच फायदा होईल. बजरंगबली विषय काढण्याची गरज नव्हती. फोडाफोडीचे राजकारण कोणी करत असेल तर धडा शिकवला पाहिजे.', असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ring Road : पुणेकरांची वाहतूककोंडीची कटकट संपणार! रिंग रोडच्या कामाला सुरूवात, वाचा कसा असेल मार्ग, किती वेळ वाचणार?

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

Homemade Facepack : चाळिशीनंतरही चेहरा दिसेल तरुण; लावा 'हा' फेसपॅक, तुमच्याच सौंदर्याचे होईल कौतुक

T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Maharashtra Live News Update : देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेज

SCROLL FOR NEXT