Mumbai Local  Saam Tv
मुंबई/पुणे

खुशखबर! 'या' मार्गिकेवर धावणार १५ डब्यांची लोकल; मुंबईकरांनो आता गर्दीचं' नो टेन्शन'

Western Railway to Introduce 15-Coach Local: २०२६ पासून उपनगरीय वेळापत्रकात मोठे बदल होणार. विरार डहाणू दरम्यान, पहिल्यांदाच १५ डब्यांची लोकल धावणार.

Bhagyashree Kamble

  • मुंबई उपनगरीय प्रवाशांसाठी मोठी बातमी

  • विरार डहाणू दरम्यान धावणार १५ डब्यांची लोकल

  • लवकरच उपनगरीय वेळापत्रकात बदल होणार

मुंबई उपनगरीय प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं विरार ते डहाणू दरम्यान, पहिल्यांदाच १५ डब्यांची लोकल ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. या मार्गावरील वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेटिंग विभागाने बोर्डाला पत्र पाठवले आहे. पत्र मंजूर होताच विरार डहाणू दरम्यान १५ डब्यांची लोकल धावेल.

मिळालेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस गाड्यांसाठी १ जानवारी २०२६ पासून नवीन वेळापत्रक लागू केला जाईल. तर, उपनगरीय गाड्यांसाठी मार्च किंवा एप्रिलपासून लागू केले जाईल. नवीन वेळापत्रकात चर्चगेट ते विरार दरम्यान १० ते १२ सर्विसची योजना आखण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेला जानेवारी २०२६ पर्यंत एक नवीन एसी रेक मिळू शके. एका एसी रेकची भर पडल्यानं एसी सेवांची संख्या १० ने वाढेल.

याचा थेट फायदा उपनगरीय भागातील रहिवाशांना आणि प्रवाशांना होईल. यामुळे लोकलमधील गर्दी देखील कमी होईल.

मेट्रो - ३ प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मेट्रो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पहिल्यांदाच मेट्रो कनेक्ट ३ प्रवाशांसाठी सवलतीचे मासिक पास सादर केले आहे. यामुळे दैनंदिन प्रवाशांचा खर्च कमी होईल. कामावर ये-जा करण्यासाठी, तसेच मेट्रोवर अवलंबून असलेल्यांसाठी ही ऑफर फायदेशीर ठरेल. या उपक्रमामुळे मोठ्या संख्येनं प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT