Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mega Block: पश्चिम रेल्वेवर पुढील २ दिवस जम्बो मेगाब्लॉक, ३४४ लोकल सेवा रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Nighttime Mega Block on Western Line to Affect Travel Plans: पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळेस मोठा फटका बसणार आहे. शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस मेगा ब्लॉक असणार आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईकरांनो कृपया इथे लक्ष द्या. पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळेस मोठा फटका बसणार आहे. माहिम ते बांद्रा स्थानकादरम्यान, पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रोजी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे तब्बल ३४४ लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.

ब्लॉकचा कालावधी

शुक्रवार (११ एप्रिल)

अप डाऊन धिम्या मार्गावर: रात्री ११:०० ते सकाळी ८:३० पर्यंत,

अप डाऊन जलद मार्गावर: रात्री १२:३० ते सकाळी ६:३० पर्यंत.

यावेळी चर्चगेट स्थानकातून रात्री १०:२३ सुटणाऱ्या सर्व डाऊन लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

शनिवारी (१२ एप्रिल)

अप डाऊन धिम्या मार्गावर: रात्री ११:३० ते सकाळी ९:००.

अप जलद मार्गावर: रात्री ११:३० ते सकाळी ८:००.

या काळात चर्चरगेट दादर दरम्यान, जलद लोकल धावणार आहेत.

तसेच डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.

प्रमुख लोकल सेवा वेळापत्रक बदल (शनीवार- रविवार)

शनिवार शेवटची लोकल: १०:५३

रविवारी पहिल्या लोकलचे वेळापत्रक:

चर्चगेट - विरार धीमी लोकल: सकाळी ८:०८

भाईंदर - चर्चगेट लोकल: सकाळी ८:२४

विरार - चर्चगेट जलद लोकल: सकाळी ८:१८

चर्चगेट - विरार जलद लोकल: सकाळी ९:०३

प्रवाशांना आवाहन:

रेल्वे प्रशासनाकडून वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था आखणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT