Weather Update in Maharashtra 9 July 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Weather Alert : पुण्यासह ९ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, तुफान पाऊस कोसळणार; वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Weather Updates : भारतीय हवामान विभागाने आज रविवारपासून (ता. ६) कोकण, मध्य महाराष्ट्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

ऑक्टोबर महिना सुरुवातीलाच राज्यात उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. मान्सूनची परतीची वाटचाल सुरु असतानाच विदर्भातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे आहे. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असून उन्हाच्या तडाख्यामुळे लाही लाही होत आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.

भारतीय हवामान विभागाने आज रविवारपासून (ता. ६) पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) दिला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असून, शनिवारी (५ ऑक्टोबर) नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस (Monsoon Rain Alert) माघारी फिरला आहे. हवामानाची अशीच स्थिती राहिल्यास नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यातून परतण्याचा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज संपूर्ण कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार आहे. तर पुणे, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT