Maharashtra Rain News 24 June 2024 Saam TV
मुंबई/पुणे

Weather Forecast : आनंदवार्ता, मान्सूननं व्यापला संपूर्ण महाराष्ट्र; आजपासून 'या' भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain News 24 June 2024 : मान्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून आजपासून अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

राज्यातील शेतकरी आणि नागरिक ज्या गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. ती गोष्ट अखेर घडली आहे. मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी देखील पोषक वातावरण तयार झाले आहे. ही आनंदवार्ता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. आज सोमवारपासून पुढील आठवडाभर राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा पर्यटनस्थळी जाणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या आठवड्यात दमदार बॅटिंग केल्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली. परिणामी अनेक भागात पावसाची तूट राहिली. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. काही ठिकाणी पेरण्या देखील खोळंबल्याचं दिसून आलं.

मान्सून संपूर्ण राज्याला व्यापून धो-धो पाऊस कधी बरसणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर मान्सूनने जोरदार पुनरागमन करून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यामुळे आज सोमवारपासून पुढील आठवडाभरात राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बसरणार आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

राज्यात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

आजपासून मुंबई, पुणे, ठाणे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT