Ink was thrown on Chandrakant Patil Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Patil : घरात घुसून उत्तर देऊ; चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर भाजप नेते आक्रमक

Ink was thrown on Chandrakant Patil: अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून मारू असा संतप्त इशारा भाजप आमदार राम कदम यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chandrakant Patil Latest News: भाजप नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी काल औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ' कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून चौफेर टीका झाली. त्यानंतर आज, शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेक करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर भाजप नेते अतिशय आक्रमक झाले आहे. अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना घरात घुसून मारू असा संतप्त इशारा भाजप आमदार राम कदम यांनी दिला आहे. (Pune Latest News)

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चौक पोलीस बंदोबस्त असूनही काही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली आहे. चंद्रकांत पाटील हे आज चिंचवड गावात मोरया गोसावी महोत्सवासाठी हजर झाले आहेत. त्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली आहे. (Latest Marathi News)

घटनेनंतर शाईफेक करणाऱ्याला चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेनंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT