Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू : उद्धव ठाकरे

काश्मिरी पंडित पुन्हा संकटात सापडला आहे.पंडितांचे हत्याकांड आणि पलायन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : काश्मिरी पंडित (Kashmir Pandit) पुन्हा संकटात सापडला आहे.पंडितांचे हत्याकांड आणि पलायन याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठाम उभा राहील. जे जे शक्य आहे ते सर्व करेल,अशी भूमिका मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. ( Uddhav Thackeray News In Marathi )

हे देखील पाहा -

गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांची हत्येचे प्रकरण गेल्या ९ महिन्यांपासून घडत आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील शेकडो भयभीत पंडित आता पलायन करू लागले आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, 'काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे शिरकाण सुरू आहे. पंडितांना घरवापसीची स्वप्ने दाखवली गेली, परंतु आता त्यांना स्वप्ने दूरच त्यांना आता वेचून मारले जात आहे. ही घटना अस्वस्थ करणारी आहे. याक्षणी या काश्मिरी पंडितांच्या पाठीशी महाराष्ट्र ठाम उभा राहिल, असं मुख्यमंत्री म्हणून वचन देत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले,'१९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार अवतरले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने कश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला, याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा सांगतो, कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत, दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT