Jayant Patil Saam TV
मुंबई/पुणे

वेळ आली तर कॅबिनेटच्या मिटींगसाठी कोर्टातही स्क्रीन लावू; जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

भाजप सारखी आम्ही सुडाची भावना ठेवत त्या भावनेतून आम्ही कोणावरती कारवाई करणार नाही.

जयश्री मोरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेध म्हणून आज चेंबूर पांजरापोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून तीव्र आंदोलन व निदर्शनं करण्यात आलं यावेळी प्रदेश अध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) उपस्थित होते.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता भाजपने महाविकास आघाडीवरती केलेला टीकेला उत्तर त्यांनी दिलं. आता कॅबिनेटच्या मिटींगसाठी कोर्टातच एक स्क्रीन लावावी लागेल या भाजप मंत्र्यांच्या व्यक्तव्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, 'तुम्ही सर्वांवर खोटे आरोप करून त्यांना तुरुंगामध्ये टाकण्याची भूमिका घेणार असाल, तर तसही करावं लागेलं, तुम्ही सर्वांना तुरुंगात घालायला लागला तर काय करणार, तुमच्या खोट्या आरोपावरुन आम्ही थोडंच राजीनामा घेणार आहे असं म्हणत त्यांनी मलिकांचा राजीनामा (Resigned) घेणार नसल्याचही स्पष्ट केलं.

ते पुढे म्हणाले, ' भाजप सारखी आम्ही सुडाची भावना ठेवत त्या भावनेतून आम्ही कोणावरती कारवाई करणार नाही राजकारणात तसं करायचही नसतं असंही ते म्हणाले. शिवाय भाजप असे किती खोटे आरोप करणार आणि असे किती लोकांना अटक करणार, तरी सुद्धा महाविकास आघाडी शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, ते म्हणाले, 'आतापर्यंत राज्य सरकारकडे भाजपचं लक्ष होतं आता मुंबई महापालिकेकडे लक्ष आहे. मुंबईकरांना आणि राज्यातल्या जनतेला कळतं की कशा पद्धतीने तपास संस्थांचा गैरवापर केला जात आहे.'

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT