waterlogged at swargate msrtc bus stand Saam Digital
मुंबई/पुणे

Swargate Bus Stand: प्रवासी संतापले, स्वारगेट स्थानकातून बस नव्हे हाेड्या चालवा; चिखल राडाराेड्यामुळे एसटी कर्मचा-यांचे आराेग्य धाेक्यात

स्वारगेट बस स्थानकातून सातारा आणि बारामती येथे विना थांबा बस सेवा पूरविली जाते. काही प्रवासी म्हणाले किरकोळ एक पाऊस पडला की स्वारगेट स्थानकामध्ये पाण्याचे तळे साचत आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

पुण्यात पाऊस आला की धडकी भरते ते राज्यातून पुण्यात आलेल्या प्रवाशांना. कारण ही तसेच आहे. पावसामुळे स्वारगेट बस थांब्यावर माेठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणा-या प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. दरम्यान स्वारगेट बस थांब्यांवर साचत असलेल्या पाण्यामुळे एसटी चालक, वाहकांना देखील त्रास हाेते परंतु काेणाला दाद मागायची असा प्रश्न कदाचित त्यांना पडत असावा अशी चर्चा आहे. (Maharashtra News)

स्वारगेट एसटी आगारात सातत्याने साचलेल्या पाण्याच्या तळ्यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण झाले आहेत. एसटी अधिकार्‍यांकडून याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे असा आराेप नियमीत प्रवास करणारे प्रवासी करतात. स्वारगेट स्थानकातील हे तळे आणि त्याच्या परिसरातील खड्डे, चिखल,यांपासून आमची सुटका कधी होणार? असा सवाल प्रवासी करु लागले आहेत. या बसस्थानकातून बस नव्हे आता हाेड्यांची गरज असल्याचे चित्र असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

या स्थानकातून सातारा आणि बारामती येथे विना थांबा बस सेवा पूरविली जाते. काही प्रवासी म्हणाले किरकोळ एक पाऊस पडला की स्वारगेट स्थानकामध्ये पाण्याचे तळे साचत आहे. यातून रस्ता काढताना आम्हांला नाकी नऊ येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा प्रकार गेली काही वर्षांपासून सुरु आहे. पण अजून किती सहन करावे लागणार असा सूर प्रवाशांचा दिसून आला. यामुळे एसटीच्या अधिकार्‍यांना प्रवाशांच्या सुविधेशी काहीही घेण-देणे नसल्याचे दिसत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT