Water Storage in Pune Dam  Saam TV
मुंबई/पुणे

Water Storage in Pune Dam : पुणेकरांसाठी खुशखबर! खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Pune Dams Water Storage Today : ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करत असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

Satish Daud

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करत असलेल्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच पाणीटंचाईचं संकट दूर होण्याची शक्यता आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू. यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.

पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याला पाणीपुरवठा (Khadakwasla) करणाऱ्या धरण साखळीमध्ये 30 मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील (Pune) पाणी कपाटाची टांगती तलवार लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह परिसराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच या चारही धरणांमध्ये एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. त्यानंतर कोसळलेल्या पावसामुळे ४ धरणांमधील पाणीसाठा ४.९९ टीएमसी झाला होता. त्यानंतर आता पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळत आहे.

पुण्यातील ४ धरणातील असलेला पाणीसाठा (टक्केवारी)

  • खडकवासला : ५४.२९ टक्के

  • पानशेत : ३१.८१ टक्के

  • वरसगाव : १८.९५ टक्के

  • टेमघर : १८.१३ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT