Pune Viral Video : महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला तरुणांनी भर चौकात अद्दल घडवली.  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात मंडईपासून स्वारगेटपर्यंत बाईकवरून पाठलाग, महिलेला इशारे करत होता, तरुणांनी भर चौकात चोपलं, पाहा VIDEO

Pune crime news : पुण्यातील स्वारगेट चौकात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने दुचाकीवरून पाठलाग करत महिलेची छेड काढली. त्याला नागरिकांनी भर चौकात चोप दिला.

Saam Tv

माझ्या गाडीवर बस, तुला पैसे देतो, असं म्हणत एका व्यक्तीने महिलेची छेड काढली. पुण्यात ही घटना घडली. मंडईपासून स्वारगेटपर्यंत या महिलेचा पाठलाग करत होता. त्याला काही तरुणांनी भर चौकात जन्माची अद्दल घडवली. त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.

महिलेची भर रस्त्यात छेड काढणाऱ्या व्यक्तीला तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. पुण्यातील (Pune) स्वारगेट चौकात ही घटना घडली. संशयित आरोपी हा मंडईपासून स्वारगेटपर्यंत दुचाकीवरून चालला होता. तो महिलेची छेड काढत होता. तुला पैसे देतो, तू माझ्या गाडीवर बस, असं तिला बोलत होता. तिला सारखं खुणावत होता. अखेर ही महिला संतापली. हा प्रकार रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही तरुणांच्या लक्षात आला.

(या घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा)

या तरुणांनी महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप दिला. स्वारगेट चौकातच त्याला थांबवून मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला स्वारगेट पोलिसांच्या हवाली केले. महिलेच्या तक्रारीवरून स्वारगेट पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यातील स्वारगेट चौकामध्येच ही घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीने महिलेचा पाठलाग सुरू केला. मंडईपासून स्वारगेटपर्यंत त्याने पीडित महिलेचा पाठलाग केला. तिला तो हाताने इशारे करत होता. तिला खुणावत होता. पैसे देतो, माझ्या गाडीवर बस, असं म्हणत होता. या सर्व प्रकाराला महिला वैतागली. तिने आरडाओरड केली. त्यावेळी काही तरुणांनी आरोपीला पकडले आणि बेदम मारहाण केली. या व्यक्तीविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT