Palghar Politics Saam tv
मुंबई/पुणे

विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

Palghar Politics : पालघरमध्ये विजयी मिरवणुकीत राडा झाला. कारवर फटाके फोडण्याला विरोध केल्याने भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना उघड केली आहे.

Vishal Gangurde

पालघर नगरसेवकाच्या मिरवणुकीत राडा

नगरसेवक तेजेश पाटील यांच्या मिरवणुकीत दोन महिलांना मारहाण

मारहाण झालेल्या दोन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू

फैय्याज शेख, साम टीव्ही

राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. पालघरमध्ये नगरपंचायतीचाही रविवारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एका प्रभागातून भाजप नगरसेवक तेजेश पाटील विजयी झाले. या निकालानंतर विजयी मिरवणूक काढताना मोठा राडा झाल्याची घटना घडली. या विजयी मिरवणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दोन महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपा नगरसेवक तेजेश पाटील यांच्या मिरवणुकीत सीएनजी गाडीसमोर फटाके वाजविण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली. वाडा शहरात रविवारी दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

या महिलांवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाडा पोलीस स्टेशन मध्ये महिलांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे . आरोपींना अटक तात्काळ करण्यात यावी अशी जखमी महिलांची सरकारकडे मागणी आहे.

भाजपचे विजयी नगरसेवक तेजेश पाटील यांची मिरवणूक आमच्या घरासमोर आल्यानंतर आमच्या कारवर फटाक्याची माळ फोडली असताना सीएनजी गाडीसमोर आम्ही त्यांना विरोध केला. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून महिलांना मारहाण केली. सरकारकडे आमची मागणी हे आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी महिलांनी केली.

सोलापुरात निवडणुकीच्या निकालानंतर दगडफेक

सोलापूरच्या बार्शी नगरपरिषद निवडणूकीला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. बार्शी नगरपरिषद निवडणूक निकालानंतर दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोलापूरच्या बार्शीतील आयनापूर मारुती रोड परिसरात सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान ही दगडफेक नेमकी कोणत्या करणामुळे झाली हे समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT