Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Posco: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ९ वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल

या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.

अजय दुधाणे

उल्हासनगर : साडेचार वर्षाच्या मुलीवर (girl) नऊ वर्षाच्या मुलाने (boy) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (vitthalwadi police station) अत्याचारासह पोक्सो (posco) कायद्या अंतर्गत संबंधित मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. (ulhasnagar latest marathi news)

पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. तिच्याच शेजारी नऊ वर्षाचा मुलगा राहत असून त्याने तीन एप्रिलला दुपारच्या सुमारास खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीला लैंगिक अत्याचारामुळे त्रास झाल्याने तिच्याकडे आईने (mother) चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर १५ एप्रिलला पीडितेच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेजारी राहणाऱ्या नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिली. संबंधित मुलावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT