Vasai Viral Video Saam tv
मुंबई/पुणे

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Vasai Viral Video : वसई पूर्वेत एका मच्छी विक्रेत्याने माशांवर झुरळ मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘लाल हिट’ स्प्रेची फवारणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Alisha Khedekar

  • वसई पूर्वेत मच्छी विक्रेत्याने माशांवर ‘लाल हिट’ स्प्रे फवारला

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता

  • स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी

मनोज तांबे, वसई

वसई पूर्वेकडील नवजीवन परिसरात मच्छी विक्रेत्याने झुरळ मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘लाल हिट’ स्प्रेची माशांवर फवारणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित मच्छी विक्रेता माशांवर आणि आजूबाजूच्या परिसरात ‘लाल हिट’ स्प्रे मारताना स्पष्टपणे दिसत आहे. प्रत्यक्षात हा स्प्रे झुरळांसारख्या कीटकांचा नायनाट करण्यासाठी वापरला जातो आणि तो अत्यंत विषारी असल्याचे मानले जाते.

अशा प्रकारे अन्नपदार्थांवर विषारी स्प्रेचा वापर केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित मच्छी विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन तसेच महानगरपालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी या ठिकाणी एका फळ विक्रेत्याने चक्क फळ धुण्यासाठी गटाराच्या पाण्याचा वापर केला होता. यामुळे वसई विरार शहरात लघु उद्योग करणाऱ्या व्यवसायाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा प्रकार वारंवार घडू लागला आहे. अशा लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.

वसई विरार शहरात काहीही होऊ शकतं कोणी येऊन कोणताही व्यवसाय करतो त्या व्यवसायाची पालिका प्रशासनाकडे कोणतीच नोंद नसते. यामुळे किती भोंगळ कारभार पालिकेचा देखील सुरू आहे याचे उत्तर उदाहरण अशा घडणाऱ्या घटनेवरून समोर येत आहे. व्यवसाय करणारे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा कोणताही विचार न करता स्वतःच्या फायद्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला असल्याचे काँग्रेस नेते रामदार वाघमारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: चंद्रपूरमध्ये पोलीस असल्याचं सांगून सोन्याचे दागिने केले लंपास

मुंबईत पाऊस कधी पडणार? ही महत्वाची माहिती वाचा

Rain Havoc : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा! भिंत कोसळून मुलीचा मृत्यू; होर्डिंग पडून तरुणाचा जागीच अंत

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुठा नदीवरील पूल कायमचा बंद, पानशेत पुलाबाबतही मोठा निर्णय; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT