Pune: राष्ट्रवादीच्या आमदारांची घोड्यावरुन मिरवणूक; मिरवणूकीत कोरोना नियमांचं उल्लंघन रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

Pune: राष्ट्रवादीच्या आमदारांची घोड्यावरुन मिरवणूक; मिरवणुकीत कोरोना नियमांचं उल्लंघन

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (District Central Co-operative Bank) संचालक पदी निवड झाल्याने त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी घोड्यावरती बसवून मिरवणूक काढली.

रोहिदास गाडगे

पुणे : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे सोशल डिस्टन्स व कोरोना नियमांचा आमदारांच्या कार्यकर्त्यांनी फज्जा उडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (District Central Co-operative Bank) संचालक पदी निवड झाल्याने त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी घोड्यावरती बसवून मिरवणूक काढली.

मात्र या मिरवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी जमली होती. आधीच पुण्यात कोरोना (Corona) रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये गर्दी जमवली तर कोरोनाचा संसर्ग जास्तच वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनाच कोरोना नियमांचा विसर पडतोय का असा सवाल सामान्य पुणेकर वितारत आहेत.

हे देखील पहा -

अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क (Mask) नाही, तसेच सोशल डिस्टन्सिंग (Social Distance) देखील पाळलं नाहीये, एकीकडे राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मास्क घाला गर्दी करु नका असं संपुर्ण राज्याला सांगत असताना त्यांच्याच आमदाराने केलेल्या या गर्दीवरती ते काय कारवाई करणार का असही नागरिक विचारत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT