राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायमल्ली

सहकारमंत्र्यांनी भर सभेत केली कानउघाडणी...

रोहिदास गाडगे

खेड - तालुक्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात,व्यासपिठावर आणि समोरील नागरिकांच्या तोंडाला मास्क नसल्याने भर कार्यक्रमात आयोजकांची सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कानउघाडणी केली आहे.
कोरोना महामारीच्या संकटाचा सामना प्रत्येकाने अनुभवला आहे. या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे देखील पहा -

पहिल्या लाटेचा सामना करत असताना दुसऱ्या लाटेच्या संकटात कधी कुणाला कुठून संसर्ग होत होता कळतही नव्हते असे असताना तिसऱ्या लाटेचा सध्या धोका टळला आहे. असं असताना आपल्या कोरोनाचे गांभिर्य राहिलेच नसल्याचा टोला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्षांसह संचालक मंडळ आणि बँक व्यवस्थापनांना सुनावले.

खेड तालुक्यातील कडुस येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते.यावेळी व्यासपिठावर राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज,उपाध्यक्ष अरुण थिगळे,आणि संचालक मंडळासह खेड चे आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते यावेळी कुनाच्या तोंडाला मास्क नसल्याची भावना भरसभेत पाटलांनी व्यक्त केली.

देशावर कोरोना महामारीचे संकट आले असताना आपल्या आर्थिक राजधानीच्या शहरांवर या संकटाचा प्रभाव वाढला होता. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवार विमान अपघात प्रकरणी सर्वात मोठी कारवाई,DGCA ची व्हीएसआरच्या विमान उड्डाणावर बंदी

Wednesday Horoscope : मनासारखा दिवस जाईल, डोके शांत ठेवून काम कराल; ५ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार

Digital Arrest: फोन आला, कोणी व्हिडिओ कॉल केला तर काय कराल? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बचावाचा मार्ग

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधी मोठी अपडेट, मॅच विनर फलंदाजानं अचानक टीम इंडियाची साथ सोडली, कारण चिंताजनक

Maharashtra Live News Update: विक्रोळीतील महालक्ष्मी डेरीतील ‘माझा’ शीतपेयात आढळला कचरा

SCROLL FOR NEXT