Vinayak Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Antilia case: अँटिलिया स्फोटक प्रकरणातील मुख्य आरोपी विनायक शिंदेला जामीन नाहीच...

विनायक शिंदे हा प्रदीप शर्मा व सचिन वाजेचा जवळचा होता. तसंच लखनभैया चकमक प्रकरणातून विनायक शिंदे मे २०२०मध्ये पॅरोलवर बाहेर आला होता.

सुरज सावंत

मुंबई : अँटिलिया (Antilia) स्फोटक प्रकरणातील मुख्य आरोपी विनायक शिंदेचा जामीन स्पेशल NIA कोर्टाने फेटाळला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विनायक शिंदे याला अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन यांना तावडे नावाने जो फोन करण्यात आला होता, तो फोनवरील व्यक्ती तावडे नसून विनायक शिंदे (Vinayak Shinde) असल्याचे तपासात समोर आले होते.

यापूर्वी नोव्हेंबर २००६ मध्ये लखनभैया बनावट चकमक प्रकरणात दोषी आढळून आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेला निलंबित केले होते. विनायक शिंदे हा प्रदीप शर्मा व सचिन वाजेचा (Sachin Waze) जवळचा होता. तसंच लखनभैया चकमक प्रकरणातून विनायक शिंदे मे २०२०मध्ये पॅरोलवर बाहेर आला होता.

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ एका वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येतील कथित भूमिका याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रियाजुद्दीन काझीला आणि वाझे यांच्यासह माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि माजी पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि सुनील माने यांचा देखील आरोपींमध्ये समावेश केला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT