Vidyanand Bapat Laser Show DJ Ban Saam TV
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात खळबळ! विद्यानंद बापाटांनी पाठवली थेट प्रशासनाला कडक नोटीस, 'या' ३ गोष्टींवर बंदीची मागणी

Vidyanand Bapat Laser Show DJ Ban : पुण्यात गणेशोत्सवात DJ आणि लेझर शोवर बंदीची मागणी करण्यात आली आहे. विद्यानंद बापट यांच्याकडून याबाबच प्रशासनाला नोटीस पाठवली असून ३ दिवसांत कारवाईचा अहवाल मागितला आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Ganeshotsav DJ and laser show ban demand : पुण्यातील विद्यानंद सुहास बापट यांनी गणेशोत्सवात ध्वनी, वायू आणि कचरा प्रदूषण रोखण्यासाठी थेट प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. रस्त्यांवरील मंडपांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळावी, अशीही मागणी त्यांनी नोटीसद्वारे केली आहे. बापट यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे आणि त्यांच्या टीमने ही नोटीस पाठवली आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) प्रादेशिक अधिकारी यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत असीम सोरोदे यांनी दिली.

धर्म आणि उत्सव नक्कीच टिकून राहिले पाहिजेत, मात्र ते नियमांच्या चौकटीतच साजरे झाले पाहिजेत. गणेशोत्सवाच्या काळात या नोटिशीची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. नोटीस मिळाल्यानंतर ३ दिवसांच्या आत उत्तर दिले नाही, तर आम्ही उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (NGT) प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध थेट कायदेशीर कारवाई करू. सणांच्या काळात अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करण्याचे कृत्य कोणीही करू नये.
ॲड. असीम सरोदे 

नोटीसीतील प्रमुख मागण्या काय आहेत?

गणेशोत्सवादरम्यान उघड्या सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेच्या ॲम्प्लीफायर यंत्रणा, डीजे (DJ) आणि डोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेझर शोच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी.

मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी. ढोल-ताशा पथकांवर मर्यादा आणावी, तसेच रुग्णालये, न्यायालये आणि शाळांच्या १०० मीटर परिसरात 'सायलेन्स झोन'चे पालन बंधनकारक करावे.

मनपाने रस्त्यांवर उभारलेल्या गणपती मंडपांची पाहणी करावी. पादचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना अडथळा ठरणारे मंडप तत्काळ हलवून अतिक्रमांवर कायदेशीर कारवाई करावी.

CO₂ कॉन्फेटी कॅनन्स, फटाके आणि प्लास्टिक कचऱ्यावर बंदी घालावी; तसेच ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी ठिकठिकाणी 'रिअल-टाइम डेसिबल डिस्प्ले बोर्ड' लावावेत.

प्रशासनाने या नोटीसची तात्काळ दखल घेऊन पुढील ३ दिवसांत केलेल्या उपायांची माहिती न दिल्यास, मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात अवमान याचिका (Contempt of Court) दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: शनिवार-रविवारच्या 'या' ६ सवयींमुळे किडनी खराब होतेय? चुका आताच सुधारा

Maharashtra News Live Update: सहा तासाच्या चौकशीनंतर दिनू मोरियाला पोलिसांनी सोडलं

Asian Games: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णपदक

CJP च्या आंदोलनात जय श्रीरामच्या घोषणा! मुंबईत मोठा गोंधळ; पाहा VIDEO

Saturday Horoscope: आज या ४ राशींना मिळणार मोठी संधी; रखडलेली कामं मार्गी लागतील, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT