shahaji bapu patil Saam Tv
मुंबई/पुणे

विधानसभेतही 'काय झाडी,काय डोंगार, काय हाटील..', शहाजीबापूंचा डायलॉग हिट

'काय झाडी,काय डोंगार, काय हाटील..' शहाजीबापूंचा हाच डायलॉग विधानसभेत देखील चर्चेत आला.

Shivani Tichkule

मुंबई - काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... एकदम ओक्केमधी हाय..' सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा हा डायलॉग महाराष्ट्रभर व्हायरल झाला. त्यांच्या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. इतकंच नाही तर या डायलॉगवर गाणंही बनवलं गेलं. आता त्यांचा हाच डायलॉग विधानसभेत देखील चर्चेत आला.

विधानसभेच्या नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी आज विधिमंडळात मतदानप्रक्रिया पार पडली. यावेळी आवाजी पद्धतीने नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदारांनी आपल्या जागेवर उभे राहत राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. यावेळी शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. मतदान करण्यासाठी शहाजीबापू पाटील जागेवर उभे राहताच सभागृहातील आमदारांनी एका सूरात 'काय झाडी,काय डोंगार, काय हाटील' असा डायलॉग म्हणाल्या सुरुवात केली आणि यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

भाजपचे राहुल नार्वेकर विजयी

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले.

राहुल नार्वेकर यांना आतापर्यंत १४५ पेक्षा जास्त सदस्यांचे मतदान झाले आहे. बहुमताचा आकडा त्यांनी पार केला आहे. बहुजन विकास आघाडी, मनसे आणि बच्चु कडू यांच्या पक्षाने राहुल नार्वेकर यांना मतदान केले आहे.

या निवडणुकीत (Election) समाजवादीचे दोन्ही आमदार तटस्थ राहिले. त्यांनी ठाकरे सरकाच्या काही निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीला १०७ मत मिळाली आहेत. तर राहुल नार्वेकर यांना १६४ मत मिळाली आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water After Tea : चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिता? सावधान! होतात 'या' ३ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

Hair Fall: केसगळती आणि केस तुटण्याची समस्या होईल कमी; आठवड्यातून २ वेळा लावा हे घरी बनवा खास तेल

SCROLL FOR NEXT