Pune Wagholi BJS College Ragging Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यातील नामांकित कॉलेज बाहेर रॅगिंग, विद्यार्थ्याला चौघांकडून बेदम मारहाण; थरारक VIDEO समोर

Pune Wagholi BJS College Ragging News : पुण्यातील वाघोली येथील BJS कॉलेजबाहेर एका विद्यार्थ्याला चौघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रॅगिंग व वाढत्या गुंडगिरीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • वाघोलीतील BJS कॉलेजबाहेर विद्यार्थ्याला बेदम मारहाण

  • रॅगिंग व गुंडगिरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती

  • नागरिकांच्या तक्रारीनंतरही ठोस कारवाई नसल्याचा आरोप

  • कॉलेज परिसरात नियमित गस्त व बंदोबस्ताची मागणी

सागर आव्हाड, पुणे

पुणे शहर विद्येचं माहेरघर मानलं जात. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का? असे प्रश्न पाडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोली येथील BJS कॉलेजच्या बाहेर चार जणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रॅगिंगच्या संतापजनक घटनेनंतर परिसरात आणि विद्यर्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बीजेएस कॉलेज परिसरात यापूर्वीही वारंवार हाणामाऱ्या व गुंडगिरीच्या घटना घडल्या आहेत. या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा वाघोली पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे असामाजिक घटकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच कॉलेज परिसरात नियमित पोलीस गस्त व कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

या मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस प्रशांत जमदाडे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. दरम्यान, वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

Maharashtra News Live Update: अमरावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती ते शेगाव नाका रोडवर वाहतूक कोंडी

२० वर्षे आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड; राजकारणात शोककळा

Milk Cake Recipe: विकेंडला लहान मुलांसाठी घरीच बनवा मऊ, स्वादिष्ट मिल्क केक; वाचा सोपी रेसिपी

माजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक मोठा धक्का; आता विश्वासू नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT