Vikram Gokhale Saam Tv
मुंबई/पुणे

Vikram Gokhale : रंगभूमीवरचा 'बॅरिस्टर' हरपला; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

मनोरंजन क्षेत्रातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Vikram Gokhale Passed Away : मनोरंजन क्षेत्रातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज (शनिवारी) अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले आणि त्यांच्या दोन मुली असा परिवार आहे.

बुधवारी रात्री गोखले यांचं निधन झालं, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र, ही बातमी चुकीची असल्याचं यापूर्वीच त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत असं वृषाली यांनी सांगितलं होते. गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले यांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.

गोखले यांची प्रकृती अद्यापही अत्यावस्थ आहे, खूप कॉम्पलिकेशन्स आहेत. त्यांच्याकडून म्हणवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत. तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफवांवर कोणी ही विश्वास ठेऊ नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, असं दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र, आता त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे.

विक्रम गोखले यांच्याविषयी माहिती

नुकताच विक्रम गोखले यांनी ३० ऑक्टोबरला ७७ वा वाढदिवस साजरा केला होता. विक्रम गोखले यांनी विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. विक्रम गोखले हे अभिनेत्यांच्या कुटुंबातील होते. त्यांची आजी अभिनेत्री होती, तर वडील चंद्रकांत गोखले हे देखील कलाकार होते.

विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिनेमात अनेका भूमिका गाजवल्या आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आजवर दिला होता. त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.

विक्रम गोखले यांना २०१३ साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. गोखले यांनी 'हम दिल दे चुके सनम', 'हे राम', 'भूल भुलैया', मिशन मंगल' इत्यादी हिंदी सिनेमा काम केलं. तसेच गोखले यांच्या अभिनयाची झलक माहेरची साडी, लपंडाव, नटसम्राट, वजीर, अनुमती इत्यादी मराठी सिनेमात पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT