CCTV Footage  Saam TV
मुंबई/पुणे

CCTV Footage : वाशीमध्ये प्रवाशांनी भरलेली बेस्ट बस थेट दुभाजकावर येऊन उलटली; अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

साम टिव्ही ब्युरो

Vashi News :

नवी मुंबईतील वाशी येथे अरेंजा कॉर्नर जवळ बेस्ट बस आणि कारचा भीषण अपघात झालाय. कारला वाचवताना बेस्ट बसचा अपघात झाला आहे. या अपघातात बस थेट दुभाजकावर गेली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही (CCTV ) व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कार बसच्या समोरून येताना दिसतेय. अपघात टाळण्यासाठी वाहन चालक तातडीने बस दुसऱ्या दिशेला वळवतो. मात्र बस वेगात असल्याने ती थेट दुभाजकावर जाते. बस दुभाजकावर गेल्याने एका बाजूने खाली झुकते. अपघातामध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे.

अपघात घडला तेव्हा या बसमध्ये देखील प्रवासी भरलेले होते. प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात झाला तेव्हा एक एक करून सर्व प्रवासी खाली उतरले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बसमध्ये जवळपास १५ ते २० प्रवासी प्रवास करत होते.

कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू

लातूर नांदेड महामार्गावर देखील आज मोठा अपघात झाला. या अपघातात महाळुंगरा पाटी येथ कार आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा भीषण अपघात झालाय. नांदेडवरून तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असेलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय.

दरम्यान या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर कारमधील इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर मृत्युमुखी पडलेले चार ही तरुण नांदेड येथील रहिवासी आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT