Sanjay Raut-Vasant More Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'माझा हातोडा पुण्यात चालणारच', लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम

Vasant More-Sanjay Raut : वसंत मोरे यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत अजून काही स्पष्टता नाही.

सूरज सावंत

Mumbai News :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी ३ दिवसांपूर्वी राज ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर वसंत मोरे यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. मात्र ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत अजून काही स्पष्टता नाही. वसंत मोरे यांच्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सध्या सुरु आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वंसत मोरे काल (१४ मार्च) शरद पवार गटाच्या पुण्यातील कार्यलयात गेले होते. तेथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे वसंत मोरे शरद पवार गटात सामील होतील, अशी चर्चा काल दिवसभर होती. (Latest Marathi News)

त्यानंतर वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. भेट राजकीय नसून, लवकरच भूमिका जाहीर करेल, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. या भेटीनंतर बोलताना वसंत मोरे यांनी म्हटलं की, मी माझी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांपुढे मांडत आहे. सर्वांसोबत सकारात्मक चर्चा सुरु आहे.

मी पुणेकरांसाठी आणि त्यांच्या हितासाठी लढतोय. माझा हातोडा पुण्यात चालणारच. मी खासदारकीबाबत माझा निर्णयावर ठाम आहे. अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी 'साम टीव्ही'शी बोलताना दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

वसंत मोरे मला भेटायला आले होते. आमच्यात तासभर चर्चा झाली. वसंत मोरे यांना मी शिवसेनेत (ठाकरे गट) येण्याची ऑफर दिली आहे. त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र ती जागा शिवसेनेकडे नसून काँग्रेसकडे आहे. त्यामुळे त्या जागेबाबत काँग्रेसचे नेते निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT