Vasai News Saamtv
मुंबई/पुणे

Vasai News: हृदयद्रावक! फुटबॉल खेळता खेळता मैदानावर कोसळला... २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ; नेमकं काय घडलं?

Vasai Latest News: मनमिळावू, उत्साही आणि विविध सामाजिक उपक्रमात हिरिहिरीने भाग घेणाऱ्या तरुणाच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन इंगळे

Vasai News: फुटबॉल खेळताना २७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना वसईत घडली आहे. ईनोसंट रिबेलो असे या तरुणाचे नाव असून तो वसईच्या चुळणे गावात रहात होता. इनोसंटला कसलाही आजार नसताना अचानक खेळताना हृृदयविकाराचा झटका आला. सामाजिक कार्यात सक्रीय असणार्‍या इनोसंटच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसई पश्चिमेच्या चुळणे गावात राहणारा ईनोसंट रिबेलो (२७) हा तरुण नियमित फुटबॉल खेळायला जात होता. रविवारी दुपारी तो नेहमीप्रमाणे फुटबॉल खेळायला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात गेला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. मात्र बरं वाटल्याने तो थोड्यावेळाने पुन्हा फुटबॉल खेळायला गेला.

यावेळी मात्र तो मैदानातच कोसळला. घटनेनंतर त्याला त्वरीत बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारादम्यान संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख...

बीएस्सी पर्यंत पदवी शिक्षण घेतलेला ईनोसंट एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. करोना नंतर ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने तो घरातून काम करायचा आणि आठवड्यातून एकदा नवी मुंबई येथील कंपनीच्या कार्यालयात जायचा. तो युवा जागृती सेवा संघाचा अध्यक्ष होता आणि विविध सामाजिक कार्यात भाग घेत होता.

त्याचे आई वडिल शिक्षक आहे. वडिल चार्ल्स रिबेलो हे चुळणे गावचे माजी उपसरपंच आणि जागृती सेवा संघाचे माजी अध्यक्ष होते. अविवाहित असलेल्या ईनोसंटला एक भाऊ आहे. त्याला कसलाही आजार नव्हता. तो एकदम मनमिळावू आणि उत्साही तरुण होता. विविध सामाजिक उपक्रमात तो हिरिहिरीने भाग घेत असे. वडिलांच्या समाज कार्याचा वारसा तो चालवत होता. त्याच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT