Ganpat Gaikwad Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Ganpat Gaikwad: गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड, गुन्हा दाखल

Ganpat Gaikwad Latest News: गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचा ऑफिसची काही तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Ganpat Gaikwad Latest News:

गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचा ऑफिसची काही तरुणांकडून तोडफोड करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात ही घटना घडली.

कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. एक तरुण केबल कार्यालयासमोर बाईक सोबत काहीतरी करत होता. त्या तरुणाला केबल कार्यालयातील एका कर्मचार्‍याने हटकले त्यातूनच हा वाद झाला या तरुणाने आपल्या सहकाऱ्यांना बोलावले व त्यानंतर त्यांनी केबल ऑफिसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे पाच सहकारी गोळीबार प्रकरणात तळोजा तुरुंगात आहेत. या प्रकरणात जखमी गोळीबार शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहे. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Latest News)

कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात. सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती. त्या बाईकसोबत एक तरुण काहीतरी करत होता. कार्यालयातील एका व्यक्तीने हे पाहिले .त्यांनी त्या तरुणाला हटकले त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणांसोबत वाद सुरू झाला. या तरुणांनी आपल्या पाच ते सहा सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले.

सहा तरुण केबल कार्यालयाच्या समोर आले. सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी सहा आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणारे तरुण कोण आहेत? या प्रकरणाच्या तपास आता कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या साह्याने पोलिसांच्या तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांचे हे कार्यालय त्यांच्या निवासस्थान आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून काही अंतरावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT