Vaishnavi Hagawane Case Saam Tv
मुंबई/पुणे

सासू-नणंदेनं मारलं, अंगावर थुंकली; वैष्णवी हगवणेच्या छळाची कहाणी सांगताना आईवडिलांना कोसळलं रडू

Vaishnavi Hagawane Case : राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा, वैष्णवी हगवणेचा १६ मे रोजी मृत्यू झाला. हगवणे कुटुंबाकडून झालेल्या छळामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

Yash Shirke

राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने, वैष्णवीने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात म्हटले गेले. वैष्णवीच्या जाण्याने तिच्या माहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले आहे. सासरी हुंड्यावरुन वैष्णवीला त्रास दिला जात होता असे तिच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

'प्रेमविवाह केल्याने वैष्णवी तिच्या त्रासाबद्दल काही सांगायची नाही. ती सगळं लपवत होती. सासरकडच्यांनी गौरी गणपतीच्या सणात चांदीच्या गौराई मागितल्या. तेव्हा पहिल्यांदा तिने दिला जाणाऱ्या त्रासाबद्दल रडत-रडत सगळं सांगितलं. ते मानसिक आणि शारीरिक त्रास देत असत. वैष्णवीने हळूहळू सर्वकाही सांगायला सुरुवात केली. दरवेळी तिला मारहाण होत असे', असे वैष्णवीच्या आईने म्हटले.

दोन महिन्यांपूर्वी वैष्णवीच्या नणंदेने तिला मारहाण केली होती. ती वैष्णवीच्या अंगावर थुंकली होती. तिच्या सासूने आणि नणंदेने तिला बालेवाडीपर्यंत आणले. कारमध्ये त्रास सहन न झाल्याने तिने गाडीतून उडी टाकेन असे म्हटले, तेव्हा वैष्णवीला माहेरी आणले. सासू आणि नणंदेचे मी पाय धरले. माझ्या लेकीकडून चूक झाली असेल तर माफ करा मी तुमची माफी मागतो असे म्हटल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.

वैष्णवीचे वडील म्हणाले, 'लग्नानंतर पाच ते सहा महिन्यांनी वैष्णवीचा छळ सुरु झाला. ती घरी आली की पप्पा पैसे द्या म्हणायची. हगवणे कुटुंबाने तिला खूप त्रास दिला. लग्नात मी साडेसात किलोची चांदीची ५ ताटं, ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती. जावयाला सोन्याची अंगठी, दीड लाखांचा फोन दिला होता. दर दीड-दोन महिन्यांनी ती जेव्हा घरी यायची, तेव्हा ५० हजार-१ लाख रुपये द्यायचो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT