Vaishnavi Hagawane Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: निर्लज्जपणाचा कळस! वैष्णवीच्या मृत्यूनंतर इकडे महाराष्ट्रात हळहळ, तिकडे राजेंद्र हगवणेचा मटणावर ताव| VIDEO

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणातील फरार आरोपी तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणेला पोलिसांनी अटक केली. स्वारगेट परिसरातून त्यांना अटक करण्यात आली.

Priya More

वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. वैष्णवीचा छळ करून तिला हालहाल करून मारलं. तिनं आत्महत्या केल्यानंतर तिचा सासरा आणि दीर अटकेच्या भीतीने फरार झाले होते. वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. वैष्णवी प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशिल हगवणे हॉटेलमध्ये बसून मटण पार्टी करत होता. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

निर्लज्जपणाचा कळस म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूवर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे तिचा फरार झालेला सासरा आणि दीर हॉटेलमध्ये मटण पार्टी करत होते. राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत होता याचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. १७ मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. तळेगाव दाभाडे येथील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये ते मटणावर ताव मारत असल्याची माहिती समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार असलेला तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे या दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांना आज पहाटे अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या मागावर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम'

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT