मुंबईत या दिवशी लसीकरण बंद...  Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत या दिवशी लसीकरण बंद...

लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोविड-19 Covid प्रतिबंध लसीकरण Vaccination मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने मुंबई महानगरपालिका Mumbai क्षेत्रामधील शासकीय Govt आणि महानगरपालिका Municipal Corporation लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवारी १९ आणि शुक्रवारी २० ऑगस्ट या दिवशी संपूर्ण लसीकरण बंद राहणार आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, बुधवारी काही लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसीची उपलब्धता नसल्यामुळे मुंबई मधील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. कोरोनापासून बचाव करण्याकरिता लस घेणे आवश्यक राहिले आहे पण, आतापर्यंत खूपवेळा मुंबई मधील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

यातुन मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. आज देखील काही ठिकाणी लसीकरण बंद असल्यामुळे लोकांनी रांग लावून देखील डोस मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण दिसून आले आहे. दरम्यान, पालिकेला आतापर्यंत तरी लसीचा साठा उपलब्ध झाला नाही. यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होणार आहे. त्याप्रमाणे अनुरूप योग्य निर्णय घेवून, मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येणार आहे. लस साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT