ramdhani yadav death in mulund Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईचा प्रवास शेवटचा ठरला; मुलुंड दुर्घटनेत उत्तर प्रदेशच्या सरपंचाचा मृत्यू

ramdhani yadav death in mulund : उत्तर प्रदेशच्या सरपंचाचा मुलुंड दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

मुलुंडच्या एलबीएस रोडवर मेट्रो स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला

दुर्घटनेत तिघे जखमी झाले

मुंबईतील वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो-४ ग्रीन लाइनवरील मुलुंडमधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात उत्तर प्रदेशमधील एका गावचे सरपंच रामधनी यादव यांचा मृत्यू झाला आहे.

वडाळा-ठाणे-कासारवडली मेट्रो मार्गिकेचं काम सुरू असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. यादरम्यान रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा आणि कारवर कोसळला. स्लॅब कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. या दुर्घघटनेनंतर राज्य सरकारने दिवगंत सरपंच रामधनी यादव यांच्या वारसाला ५ लाखांची मदतीची घोषणा करण्यात आलीये.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव हे मुंबई फिरायला आले होते. सरपंच यादव यांच्या मित्राचे मुलुंडमध्ये ऊसाचे दुकान आहे. मित्राची भेट घेतल्यानंतर सरपंच रामधनी हे नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी रिक्षाने निघाले. या रिक्षात सरपंच रामधनी यादव, माजी सरपंच महेंद्र यादव, रिक्षाचालक बबलू यादव होते.

दुपारच्या सुमारास मेट्रोचा स्लॅब कोसळून सरपंच रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच रामधनी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच यादव यांच्या कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. रामधनी यांच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरपंच रामधनी यादव आणि माजी सरपंच महेंद्र यादव हे दोन दिवसात गावी उत्तर प्रदेशात जाणार होते. मात्र, घरी जाण्यापूर्वी त्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अमरावतीत पहिल्याचं आठवड्यात पारा 40 अंशाच्या उंबरठ्यावर, अमरावतीत पारा 39. 8 अंशावर

Success Story : दररोज ९ तास अभ्यास! नगरचा धनंजय क्लास वन अधिकारी झाला, शेतकऱ्याच्या लेकाची यशोगाथा वाचाच

MasterChef India 9 Winner : महाराष्ट्रात आली 'मास्टर शेफ'ची ट्रॉफी; 2 भावांना किती मिळले बक्षीस? पारंपरिक चवीने जिंकली लाखो लोकांची मने

PM Kisan Yojana: खुशखबर! १३ मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

Hair Care : केसांना गरम तेल लावल्याने काय होते? जाणून घ्या योग्य पध्दत

SCROLL FOR NEXT