Urgent meeting called by CM Eknath Shinde on Maratha reservation Manoj Jarange Latest updates Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation: मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, CM शिंदेंनी बोलावली महत्वाची बैठक; नेमकं काय घडतंय?

Maratha Reservation News: मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.

Satish Daud

Maratha Reservation Latest Updates

राज्य सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिला. दरम्यान, जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या वतीने हालचालींना कमालीचा वेग आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत एक आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीमध्ये शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. नुकतीच मागासवर्गीय आयोगाची पुण्यात बैठक पार पडली होती.

मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक

त्यानंतर आज मुंबईत महत्वाची बैठक होणार असल्याने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार मोठा निर्णय घेणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मुंबईत आज मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी या बैठकीतून आढावा घेतला जाईल. या बैठकीला मुंबईतील मराठा समन्वयक देखील उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क, आझाद मैदान आणि बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स याची देखील मराठा समन्वयक पाहणी करणार आहे.

मराठा सेवकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर मराठा सेवकांचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या मुंबईच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार आहे. सकाळी ९ वाजता शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

Guru Gochar 2025: दिवाळीला झालं गुरु ग्रहाचं राशी परिवर्तन; 'या' ३ राशींवर सणाला बरसणार पैसा

SCROLL FOR NEXT