Devendra Fadnavis should Resign, Maratha Kranti Morcha demands Saam Tv
मुंबई/पुणे

Maratha Andolan: फडणवीस यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Maratha Reservation Protest: फडणवीस यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Satish Kengar

Maratha Reservation Protest:

जालना येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून, मुंबईतील दादर येथे उद्या, रविवारी सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.

जालना येथील घटनेचा निषेध केला जाईल. जोपर्यंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

उद्याच्या आंदोलनानंतर मुंबईत विभागवार आंदोलने केली जातील. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत शांततेत आंदोलन करत होतो. आम्हाला पकडून घरात घुसून मारलं. आता जशास तसं उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला. (Latest Marathi News)

बीडच्या परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

दरम्यान, 2018 नंतर पुन्हा एकदा बीडच्या परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. काल घडलेल्या सराटे आंतरवाली येथील घटनेनंतर, आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. आता परळी मधून बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

परळी शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुटणार नाही, असा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT