Mumbai rain Saam tV
मुंबई/पुणे

Mumabi Rain News: मुंबईत जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पाणी साचलं

Mumbai Rain : पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आदी भागात पावसाच्या हलकी सरी कोसळल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईतही काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबई उपनगरात वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. (Mumbai Rain)

पश्चिम उपनगरातील अंधेरी, वर्सोवा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आदी भागात पावसाच्या हलकी सरी कोसळल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची काहीशी तारांबळही झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळालं. (Latest News Update)

मुंबईत मागील दोन दिवसापासून तापमान वाढीबरोबरच प्रचंड उकाडा देखील जाणवत होता. अशातच रात्री उशिरा अचानक मुंबई उपनगरातील विमानतळ परिसर, विलेपार्ले, जुहू, अंधेरी, बोरिवली नॅशनल पार्क आधी परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT