unknown woman by entering Mumbai ministry  Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! अज्ञात महिला मंत्रालयात घुसली, देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड; VIDEO आला समोर

Devendra Fadnavis Mantralaya Office Vandalized : मुंबईच्या मंत्रालय परिसरात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेने विनापास मंत्रालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडाली.

Satish Daud

मुंबईच्या मंत्रालय परिसरात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. एका महिलेने विनापास मंत्रालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी या महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस येत असल्याचं पाहून महिलेने मंत्रालयातून पोबारा केला. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. सध्या या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालय परिसरात एक महिला आली होती. तिने काळ्या कलरचा टी शर्ट आणि जीन्स पँट असा पोशाख परिधान केलेला होता. दरम्यान, गेट पास न काढताच ही महिला सचिव गेटद्वारे केला मंत्रालयात घुसली. तिने सहाव्या मजल्यावर प्रवेश केला. तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड सुरु केली.

हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येता त्यांनी तातडीने कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सदरील महिला पसार झाली होती. ही महिला कोण होती? तिने तोडफोडीचे कृत्य का केले? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अज्ञात महिला विनापास मंत्रालयात घुसल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. महिला तोडफोड करतानाचा व्हिडीओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT