SRPF जवानाचा अनोखा स्वातंत्र्यदिन  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

SRPF जवानाचा अनोखा स्वातंत्र्यदिन

आज पुण्यात पोलीस दलातील एका शिपायाने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. दरवर्षी रस्त्यावरील गरीब लोकांबरोबर हा पोलीस शिपाई स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : आज पुण्यात पोलीस दलातील एका शिपायाने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. दरवर्षी रस्त्यावरील गरीब लोकांबरोबर हा पोलीस शिपाई स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो. आजही या पोलिस शिपायाचं वेगळं रूप पुण्यातील वानवडी परिसरामध्ये पाहायला मिळालं.

हे देखील पहा -

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-2 चे जवान युगराज खानू पुजारी यांनी दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय सन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. युगराज खानू पुजारी हे एसआरपीएफ ग्रुप 2 मध्ये कार्यरत असून लहानपणापासूनच त्यांना खाकीवर्दी व राष्ट्रीय सणांची खूप आवड आहे. त्यामुळे शालेय जीवनात एमसीसी व कॉलेज जीवनात एनसीसी पूर्ण करून वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले.

तेव्हापासून ते प्रत्येक राष्ट्रीय सणादिवशी आपले पोट भरण्यासाठी कामावर जाणारे गोरगरीब रस्त्याच्या बाजूला असलेले भारतीय नागरिक त्यांच्यासोबत राहून त्यांना ध्वजाचे मानचिन्ह व जिलेबी देऊन त्यांच्यासोबत साजरा करतात. गेले सात वर्षे हा उपक्रम 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी उत्साहात साजरा होतो. एकट्याने सुरू केलेल्या या युगराज पुजारी यांच्या उपक्रमात आता सात ते आठ त्यांचे सहकारी जवान त्यांना साथ देतात.

या उपक्रमामागे युगराज पुजारी यांचा लोकांच्या मनात देशाविषयी प्रेम व खाकी विषयी आदर निर्माण करणे हा एकच उद्देश आहे. संविधान चौक, जांभुळकर चौक, फातिमानगर, पुलगेट या परिसरात सुमारे 70 ते 80 लोकांना भेटून त्यांच्यासोबत हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT