मुंबई/पुणे

Raosaheb Danve | चव्हाण-फडणवीस यांच्या भेटीवर रावसाहेब दानवे म्हणाले,'तेव्हा दोन खासदार...'

अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता भाजप नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Raosaheb Danve News In Marathi : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आता भाजप नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस भेटीवर भाष्य केलं आहे. 'आज पुढच्या गोष्टीचा अंदाज लावणे शक्य नाही. आधी पाच-पाच वर्षांचा अंदाज लावला जायचा. आता तसा लावता येत नाही. आमचा १९८४ साली लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. तेव्हा दोन खासदार निवडून आले. पण आमचा पक्ष आज उभा राहिला. पण काँग्रेसमध्ये तसा नेता नाही. त्यामुळे कोण कुठे जाईल याचा नेम नाही. आम्ही असे जाळे टाकत नाही. अशोक चव्हाणांची देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. पण तशी काही चर्चा झाली नाही'.

अशोक चव्हाण पुढे म्हणाले, 'आमचे सरकार बहुमतात आहे. तेव्हा ते असे काही घडणार नाही. आम्ही नाराजीचा उपयोग आज करणार नाही. वेळ येईल तेव्हा करू. अनेक आमदार आणि खासदारांसोबत मी काम केलं आहे. प्रत्येक जण आपलं घर शोधत असतो. आता कोण शोधतो हे सांगत नाही'.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपते जेष्ठ नेते अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील रावसाहेब दानवे यांनी देखील भाष्य केलं.

'अमित शाह हे मुंबईत येतात, याचा कुठलाही राजकीय अर्थ लावू नये. याआधी देखील अमित शाह येत होते. लालबागचा राजाचे दर्शन घ्यायचे आहे, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. त्यानंतर अजून दोन ते तीन ठिकाणी जातील. तसेच अमित शाह हे आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही घरी जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गंगापूर धरण ७३ टक्के भरलं, धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

SCROLL FOR NEXT