Eknath Shinde and uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

सेनेचे आणखी ३ खासदार शिंदे गटात सामील होणार ? केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

आता सेनेचे आणखी ३ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे १२ खासदार काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ते शिंदे गटात सामील झाले. सेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. त्यानंतर आता सेनेचे आणखी ३ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे. (Ramdas Athawale News In Marathi)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ३ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा केला. शिवसेना नेत्यांकडून शिंदे सरकार पडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर रामदस आठवले म्हणाले,हे सरकार पडणार या अफवा आहेत. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करणार आहे.राष्ट्रपतींच्या शपथविधीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे'.

खरी शिवसेना कोणाची यावर भाष्य करताना आठवले म्हणाले, ज्यांच्याकडे बहुमत त्यांची शिवसेना आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे. आता आणखी तीन खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत'. उद्धव ठाकरे उभारी घेणार का या प्रश्नावर भाष्य करताना आठवले म्हणाले, 'उद्धव ठाकरे उभारी घेतली असं वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात संख्या वाढेल. ठाकरे नसले तरी शिंदे आहेत म्हणजे खरी शिवसेना सोबत आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या जास्तीत जास्त जागा येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT